व्हायरल व्हिडीओ: दिवाळी साठी लायटिंग झुमके बाजारात, पाहा अनोखा अंदाज

IMG_20241031_123800.jpg

दिवाळी स्पेशल फॅशन ट्रेंड: लायटिंगवाले कानातले व्हायरल, महिला वर्गात खरेदीची नवी लहर

पुणे (प्रतिनिधी): सण असो किंवा कोणताही खास प्रसंग, महिलावर्गात खरेदीसाठी नेहमीच उत्सुकता दिसून येते. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आधी बाजारात नवीन कपडे, साड्या, आणि मॅचिंग ज्वेलरी खरेदी करण्याची धामधूम असते. प्रत्येक वस्तूत अनोखे काहीतरी शोधण्याकडे महिलांचा विशेष कल असतो.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात तिने बाजारातून चक्क लायटिंगवाले कानातले खरेदी केलेले आहेत. हे अनोखे कानातले लायटिंगसह चमकणारे असून, या कानातल्यांमुळे फॅशनमध्ये नवा ट्रेंड निर्माण झाला आहे.

व्हिडिओ पाहून अनेकांनी या नव्या ट्रेंडबद्दल कौतुक व्यक्त केले असून, महिला वर्गात या लायटिंगवाले कानातल्यांची विशेष चर्चा आहे. या सणात काहीतरी वेगळे खरेदी करून स्वतःची शैली दाखवण्याचा प्रयत्न महिलांकडून केला जातो, आणि यंदा लायटिंग कानातले या फॅशनचा भाग बनले आहेत.

Spread the love

You may have missed