बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी: अर्ज स्थिती तपासण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध
पुणे : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेअंतर्गत, mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवर बांधकाम कामगार योजनेंतर्गत अर्ज केलेल्या कामगारांना अर्जाची सद्यस्थिती तपासता येणार आहे.
विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र, नंतर काही काळ ही योजना स्थगित करण्यात आली होती. सध्या ही योजना पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता असून, अर्जदारांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरू शकते.
अर्जाची सद्यस्थिती कशी तपासाल?
1. सर्वप्रथम गुगलवर ‘बांधकाम कामगार योजना’ असे सर्च करा.
2. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची mahabocw.in ही अधिकृत वेबसाईट उघडा.
3. वेबसाईटवर दिलेल्या ‘बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन’ या पर्यायावर क्लिक करा.
4. आपला आधार क्रमांक व अर्ज करताना दिलेला मोबाईल क्रमांक टाका.
5. त्यानंतर ‘Proceed to form’ या पर्यायावर क्लिक करा.
6. आपल्यासमोर अर्जाची सविस्तर माहिती स्क्रीनवर दिसेल. अर्ज Accept झाला आहे की Pending, याची स्थिती येथे स्पष्ट दिसेल.
कामगारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या अर्जाची सद्यस्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. यामुळे अर्ज मंजूर झाल्यास पुढील प्रक्रियेसाठी तयार राहता येईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: mahabocw.in