जि.प.प्राथ. मराठी केंद्र शाळा, दुधनी येथे श्री. चंद्रकांत बोनार यांचा सत्कार

दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी जि.प.प्राथ. मराठी केंद्र शाळा, दुधनी येथे श्री. चंद्रकांत बोनार यांचा शाळेसाठी बारा खुर्च्या भेट दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात श्री. पोमू राठोड यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “पैसा आणि संपत्ती सर्वांकडे असते, पण ती निस्वार्थ भावनेने दान करण्याचे उदाहरण फारच कमी पाहायला मिळते. श्री. बोनार यांनी यामधून दातृत्वाचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला आहे.”
यावेळी श्री. सैदप्पा झळकी, श्री. मिहिदमिया जिडगे, व श्री. सुहास पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रविकुमार कोरचगाव यांनी केले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गोरखनाथ दोडमनी, श्रीम. शोभा म्हेत्रे मॅडम, श्री. संजीवकुमार बेण्णेसूर, व श्रीम. अंजली गुंजोटे मॅडम उपस्थित होते.
श्री. बोनार यांच्या या दातृत्वपूर्ण कार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
🪑🌷🪑🌷🪑🌷🪑🌷🪑🌷🪑🌷