दौंड-कलबुर्गी ट्रेन बंद होणार; प्रवाशांमध्ये संताप

IMG-20241108-WA0027.jpg

दौंड ते कलबुर्गी ही गाडी क्र. 01421, जी दिवाळीच्या हंगामात प्रवाशांसाठी विशेष सेवा म्हणून चालवण्यात येत होती, येत्या 11 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होणार आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

या गाडीने दौंड व आसपासच्या भागातील नागरिकांना कलबुर्गीसह इतर ठिकाणी जाणे अधिक सुलभ झाले होते. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, आणि दैनंदिन व्यापारी यांना या सेवेमुळे कमी खर्चात प्रवासाची सुविधा मिळाली होती. गाडी बंद झाल्यामुळे आता त्यांना अन्य पर्यायांचा अवलंब करावा लागेल, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतील.

प्रवाशांच्या मते, या निर्णयाने त्यांच्या दैनंदिन प्रवासात अडचणी निर्माण होतील. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला विरोध करत प्रशासनाने गाडी चालू ठेवण्याची मागणी केली आहे.

Spread the love

You may have missed