पुण्यात चितळे बंधू मिठाई दुकानावर दरोडा; CCTV फूटेजमध्ये चोरटे जाळ्यात

पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा पडला आहे. औंध बाणेर रोडवरील दुकान फोडून चोरट्यांकडून डल्ला मारण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखीस समोर आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली आहे. चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कम चोरल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखीस समोर आला आहे, व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आहे. दुकानात आल्यावर त्यांनी थेट गल्ला फोडला. यात असलेली सर्व रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
q8s6pp