Aadhar card New Rules : आधार कार्डबाबत मोठी अपडेट; आता बदल करण्यासाठी ४ कागदपत्रे अत्यंत आवश्यक, वाचा सविस्तर

आधार कार्डबाबत महत्वाची अपडेट आली आहे. जुन्या आधारकार्डात नाव, पत्ता आणि फोटो बदलण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नव्या कागदपत्रांची यादी जारी करण्यात आली आहे.
आधार कार्डसाठी ४ महत्वाचे कागदपत्रे
ओळखपत्र – पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी उपक्रमातून जारी करण्यात आलेलं ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड, पेन्शन ओळखपत्र, केंद्र सरकारची आरोग्य योजना, तृतीयपंथींना मिळालेलं ओळखपत्र या सारख्या कागदपत्रांचा वापर करता येईल.
घराचा पत्ता : घराच्या पत्त्यासाठी वीज बिल, पाण्याचा बिल, गॅसचे बिल आणि लँडलाइन बिल हे तीन महिन्यापेक्षा जुना असावा. तसेच बँक पासबुक किंवा बँक स्टेंटमेंट, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, भाडे करार, पेन्शन कागदपत्रे, राज्य किंवा केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेलं आवास प्रमाण पत्राचा वापर करता येईल.
जन्म दाखला – दहावी/बारावीच्या निकालाची प्रत, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्रावर जन्माची तारीख उल्लेख असलेले कागदपत्रे, राज्य किंवा केंद्र सरकारने दिलेल्या प्रमाणपत्रात जन्म तारखेचा उल्लेख असल्यास त्याही कागदपत्राचा वापर करता येईल.
विवाह प्रमाणपत्र- लग्नाच्या दाखल्याची गरज असल्यास तेही सादर करावं लागेल.
आधार अपडेट कसं करायचं?
myAadhaar पोर्टलवर लॉगइन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नमूद करा. पुढे कागदपत्रे अपलोड करा. तुम्ही UIDAI सिस्टीममध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अपडेट करु शकतात. अपडेट केल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाउनलोड करता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया ३-५ दिवसांच्या कार्यालयीन वेळेत पूर्ण केली जाईल.