वारजेतील झाड छाटणीचा व्हिडीओ व्हायरल;परवानगी होती का?प्रशासनाचे लक्ष आहे का?अपघात झाल्यास जबाबदार कोण?

0
IMG_20261004_19321358

वारजे, ४ ऑक्टोबर : रेणुका नगर लेन क्रमांक ३ येथील केजे टॉवर परिसरात झाडांच्या फांद्या छाटण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये झाडांची छाटणी धोकादायक पद्धतीने होत असल्याचे दिसत असून, या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या झाड छाटणीसाठी महापालिकेची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का? छाटणीदरम्यान फांद्या कोसळून नागरिक, वाहन किंवा कामगाराचे नुकसान झाल्यास जबाबदारी कोणाची? सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना न करता छाटणी सुरू असेल, तर संबंधितांवर कारवाई कोण करणार?
परवानगी घेतली नसल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई होणार का? आणि परवानगी घेतली असल्यास सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले आहे का, याची महापालिका प्रशासन चौकशी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेऊन प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed