जखमीला 40 हजारांची मदत; मात्र 3.50 लाखांच्या मागणीने वाद; ‘पोलिसांचे काम तपास करणे, वसुली नव्हे’ — वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम

0
IMG_20260220_123006.jpg

येरवडा (पुणे): येरवडा परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जखमी व्यक्तीस आरोपीच्या मामाने 40 हजार रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संबंधितांकडून 3 लाख 50 हजार रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. कायद्याप्रमाणे पोलिसांचे काम गुन्हा नोंद करणे, आरोपीला अटक करणे, तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे हे आहे. आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करणे किंवा दबाव टाकून पैसे देण्यास भाग पाडणे हे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येत नाही, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी रवींद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांच्याकडे स्पष्टीकरणासाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “गुन्ह्याचा तपास कायदेशीर पद्धतीने सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर दबाव टाकला जाणार नाही.”
पुढील तपास सुरू असून, संपूर्ण प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed