पुण्यात वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, मारहाण; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

0
IMG_20250131_004917.jpg

पुणे: वाहतूक नियमांची अंमलबजावणी करत असलेल्या पोलिसाला महिलांकडून चक्क चप्पलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली. या प्रकरणी दोन महिलांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार आजिनाथ आघाव हे हडपसर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास गाडीतळ परिसरात बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींवर कारवाई सुरू होती. यावेळी टोइंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी आरोपी महिलांची दुचाकी उचलण्यास सुरुवात केली असता, संबंधित महिलांनी या कारवाईला विरोध केला.

यावेळी बालिका सूर्यवंशी आणि संगीता लांडगे या दोघींनी हवालदार आघाव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि संतप्त महिलांनी आघाव यांना चप्पलेने मारहाण करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांना धमकीही दिली.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन्ही महिलांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *