पुणे: विश्रांतवाडी येथे दोन संशयितांची धरपकड, चोरीचा मोबाईल आणि पल्सर जप्त

0

पुणे: दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत असलेल्या तपास पथकाने दोन संशयितांना पकडून चोरीचा मोबाईल आणि पल्सर मोटारसायकल जप्त केली. तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड आणि अंमलदारांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, धानोरी रोडवरील खदानीजवळ पल्सर मोटारसायकलवर दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत थांबले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाताच दोघेही पल्सर मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मोटारसायकलवर नंबर प्लेट नसल्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपींची ओळख अर्जुन नामदेव राठोड (वय १९ वर्षे, रा. वडगाव शिंदे रोड, लोहगाव) आणि एका विधीसंघर्षित बालक अशी झाली. अर्जुनच्या अंगझडतीत त्याच्या खिशात सॅमसंग कंपनीचा मोबाईल सापडला, ज्यात सिमकार्ड नव्हते. तपासात आरोपीने हा मोबाईल धनेश्वर शाळा, मुंजाबावस्ती येथून ७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री २ वाजता एका व्यक्तीच्या हातातून हिसकावल्याची कबुली दिली.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल आणि चोरीचा मोबाईल असा एकूण १,१२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अर्जुन राठोड याला अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती अनुजा देशमाने, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, मा. श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed