पुणे: रिपब्लिकन अल्पसंख्यांक पक्षाचे युवा अध्यक्ष मा. सोहेल काझी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: दिनांक ८ ऑगस्ट, रोजी पुणे शहरातील रिपब्लिकन अल्पसंख्यांक पक्षाचे युवक कार्याध्यक्ष मा. सोहेल काझी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोंढवा वाहतूक पोलीस दलाला हेल्मेटचे वितरण करण्यात आले आणि गरजू लोकांना जेवण तसेच पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सोहेल काझी यांनी समाजात
सलोखा टिकवून ठेवला आहे, यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे शहर अध्यक्ष मा. शैलेशभाऊ चव्हाण, अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष मा. वसीम भाई पैलवान, हबीब भाई सय्यद, सोहेब शेख, श्रीकांतभाऊ कापसेपाटील आणि नादीर भाई शेख कार्यक्रमात उपस्थित होते.

