तुम्हालाही दिवसभर कानात इअरफोन घालण्याची सवय असेल, तर हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहा
तंत्रज्ञानाच्या या युगात माणूस पूर्णपणे गॅजेट्सवर अवलंबून झाला आहे. सोयीस्कर आणि आकर्षक जीवनशैलीसाठी लोकांनी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे, परंतु त्याचबरोबर त्यातून अनेक वाईट सवयीही तयार झाल्या आहेत. विशेषतः, इअरबड्स आणि इअरफोनचा तासनतास वापर हा त्यामधील एक गंभीर मुद्दा आहे.
शहरात फिरताना आता कुठेही पाहिलं तरी अनेक जण कानात इअरफोन घालून फोनमध्ये बुडालेलं दिसतात. काही लोक बाहेरील आवाज टाळण्यासाठी हे करतात, तर काहीजण फॅशन म्हणून याचा वापर करतात. मात्र, हे किती धोकादायक ठरू शकते, याचा विचार अनेकदा केला जात नाही.
सध्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, ज्यामध्ये तासनतास इअरबड्स वापरण्यामुळे होणारे शारीरिक नुकसान दाखवण्यात आले आहे. विशेषतः, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे आणि सतत इअरबड्स कानात ठेवणे हे कानांसाठी हानिकारक ठरू शकते. या व्हिडिओतून कानाच्या आतील रचनेवर होणारे परिणाम ग्राफिक्सच्या सहाय्याने दाखवले आहेत.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, इअरबड्स कानात घालताच कंपन सुरू होतात. सततच्या कंपनामुळे कानाच्या आतील नाजूक केस तुटू शकतात किंवा ते कोरडे होतात, ज्यामुळे श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. काही वेळा तर हे नुकसान कायमचे होऊ शकते.
हा व्हिडिओ X (पूर्वी ट्विटर) वर @Rainmaker1973 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या बातमीच्या वेळीपर्यंत व्हिडिओला ३४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून ९५ हजार लोकांनी याला लाईक केले आहे.
तुम्हीही इअरबड्स सतत वापरत असाल, तर हा व्हिडिओ एकदा जरूर पाहा आणि आपल्या कानांचे आरोग्य जपण्याचे महत्त्व समजून घ्या.