येरवडा: शहीद अब्दुल हमीद शाळेच्या परिसरात घाण, दारूच्या बाटल्या; शाळेचा परिसर झाला कचऱ्याचे डेपो; नागरिकांचे उदासीन वर्तन चिंताजनक

IMG_20251029_225601.jpg

येरवडा (प्रतिनिधी):
येरवडा येथील शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा आणि स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक शाळा या शिक्षणसंस्थांच्या परिसरात स्थानिक नागरिकांकडून पडिक वस्तू, घाण, तसेच दारूच्या बाटल्या टाकल्या जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते एजाज रहमान खान यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली असून, “शाळेच्या आजूबाजूला राहणारे नागरिक वारंवार सांगूनही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्यांच्या वर्तनामुळे शाळेची प्रतिमा मलीन होत आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

खान यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडे शाळेच्या परिसराची तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

स्थानिक नागरिकांनाही या प्रकरणी जागरूक राहून शाळेच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

You may have missed