बीडमध्ये आंबेजोगाई येथे घडलेल्या अमानुष मारहाणीचा प्रकार; पुण्यात अखंड मराठा समाजाचा निषेध.

पुणे, दि. 19/05/ 2025: बीड जिल्ह्यात अंबेजोगाई येथे शिवराज दिवटे तरुणावर अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित घटनेविरोधात अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याच्या वतीने जोरदार निषेध नोंदविण्यात आला आहे. व
बीड मधील मत्स्यजोग येथे ६ महिन्यांपूर्वी स्व सरपंच संतोष देशमुख यांना ज्या प्रकारे सर्व बाजूने घेराव करून रिंगण करून हाल हाल करून,असुरी आनंद घेत काठ्या, पट्टा, कत्ती, पाईप यासारख्या हत्याराने तब्बल तीन तास मारहाण करून तोंडात लघु शंका करून निर्गुण खून केला गेला तशाच पद्धतीने आंबेजोगाई येथील प्रकरणात शिवराज दिवटे याला अमानुषपणे मारहाण केली गेली आहे. त्यावेळी त्याच्यावर काही दहा ते बारा समाजकंटकांनी हातात लाठ्या-काठ्या, घेऊन अमानुष पणे मारहाण केली. व त्यावेळी त्याचा व्हिडिओ काढून वायरल करून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी यावर आपल्या मुख्यमंत्री साहेब तथा गृहमंत्री यांनी वैयक्तिक लक्ष घालून यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांची वय न बघता मोठ्या गुन्ह्यागारासारखीच वागणूक देऊन कठोरातील कठोर शिक्षक देण्यात यावी. तसेच सरकारने अशी प्रकरणे गांभीर्याने घेऊन फास्टट्रॅक कोर्टात खटले चालून गुन्हेगारावर कठोर शिक्षा करावी तरी
अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.