“येरवड्यात बांधकाम मजुरांना भांडी संच वाटपाचा उपक्रम संतोष भाऊ आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न”

IMG_20240911_013217.jpg

पुणे: येरवडा येथील माता रमाई फाउंडेशनतर्फे नोंदणीकृत बांधकाम मजुरांना भांडी संच वाटपाचा कार्यक्रम कार्यक्षम नगरसेवक संतोष भाऊ आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमाचे आयोजन श्वेता संतोष आरडे व लिंबाजी कावरे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

या कार्यक्रमात बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब ढोकणे, इंजि. सादिक लुकडे, शैलेश राजगुरू पाटील, रमजान मोमीन, तौफिक कुरेशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे बांधकाम मजुरांना मदतीचा हात देण्याचा उद्देश साधला गेला.

Spread the love

You may have missed