Suicide Attempt In Mantralaya: मंत्रालयात 5 व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी मनधरणी करत केलं रेस्क्यू (Watch Video)
Suicide Attempt In Mantralaya: मंत्रालयात अनेक वेळा लोकांनी आत्नहत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आल्या आहेत. अशा घटनांना आळा बसावा यासाठी मंत्रालयात जाळीही बसवण्यात आली आहे.
मात्र, तरीही काही लोक त्यातूनही कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा धाक(Man attempts suicide) दाखवण्यासाठी तोडगा काढतायत. अशीच एक घटना आज मंगळवारी पुन्हा मंत्रालयात घडली. अनेकवेळा शिफारस करुनही काम होत नसल्याने एक जण मंत्रालयाच्या ५ व्या मजल्यावर जाऊन बासला. तेथून त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी मनधरणी करत रेस्क्यू (Rescue)केलं. अरविंद नारायण पाटील असे त्या इसमाचे नाव आहे.
वारंवार फेऱ्या मारूनही काम होत नसल्यानं कंटाळलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी व्यक्तीला वाचवण्यात यश आलंय. या मजल्यावरील एका खिडकीवर बसून हा व्यक्ती उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार जेव्हा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना समजला तेव्हा, त्यांनी त्याचं मन वळण्याचा प्रयत्न करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलंय.
या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अरविंद नारायण पाटील असे आहे. शालेय शिक्षण विभागात ते कामानिमित्त आले होते. वारंवार येऊन काम होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची कराड-चिपळून रस्त्यात जागा गेली आहे. त्याबाबत ते आले असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, मंत्रालयात अनेक चकरा मारून देखील कर्मचारी काम काम करून देत नसल्याने नाराज होऊन त्यांनी पाऊल उचलल्याची माहिती आहे.