रायसोनी कॉलेज, पुणेच्या विद्यार्थ्यांचा ऑटोनॉमस इलेक्ट्रिक व्हेईकल डिझाइन स्पर्धेत चमकदार यश;
अखिल भारतीय स्तरावर चौथा क्रमांक; अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल स्पर्धेत विजेतेपद

पुणे – जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेच्या विद्यार्थ्यांनी ऑटोनॉमस इलेक्ट्रिक व्हेईकल डिझाइन (A-BAJA 2025) स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत अखिल भारतीय स्तरावर चौथा क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (SAE) इंटरनॅशनलतर्फे चेन्नई येथील जीएआरसी (GARC) केंद्रात नुकतीच पार पडली.
रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या संघाने तांत्रिक कौशल्य, टीमवर्क आणि नाविन्यपूर्णतेचा उत्कृष्ट संगम सादर करत स्पर्धेत तीन वेगवेगळ्या प्रकारात पारितोषिके मिळवली. विशेष म्हणजे, संघाने अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC) स्पर्धेत विजेतेपद मिळवत १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि ट्रॉफी पटकावली. तसेच ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB) डायनॅमिक स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत आपली कामगिरी सिद्ध केली.
संघाच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल रायसोनी कॉलेजच्या मार्गदर्शक प्राध्यापकांना ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या प्रकल्पाचे मार्गदर्शन डॉ. आशा शेंडगे आणि प्रा. आरती पटले यांनी केले.
या स्पर्धेतील पुरस्कार अवजड मेटेरियल मंत्रालयाचे डॉ. हनीफ कुरेशी आणि जीएआरसीचे संचालक डॉ. ए. एस. रामाधस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
रायसोनी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये प्रगत तांत्रिक कौशल्य, व्यावहारिक शिक्षण आणि स्पर्धात्मक भावना वाढवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.”
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी, कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर आणि प्रभारी डायरेक्टर डॉ. एन. बी. हुले यांनी विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
—