सोलापूर : मैंदर्गीत धडाडणार मंत्री नीतेश राणेंची तोफ; हिंदू सभेत काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष..

सोलापूर : मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नीतेश राणे उद्या (ता. १७) सोलापूर शहर व अक्कलकोटच्या दौऱ्यावर आहेत. चिपी (जि. सिंधुदुर्ग) विमानतळ येथून विमानाने त्यांचे सोलापूर विमानतळावर दुपारी ४.४५ वाजता आगमन होईल.
सोलापुरात आल्यानंतर ते नवनाथ नगरकडे जाणार आहेत. तेथे मल्लिकार्जुन पाटील यांच्या निवासस्थानी चहापानास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मड्डी वस्ती येथे ५१ फुटी हनुमान मूर्तीच्या महाआरतीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ०५.३० वाजता अक्कलकोट येथे त्यांचे आगमन होणार असून स्वामी समर्थ यांचे दर्शन घेणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे होणाऱ्या हिंदु विराट सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सकल हिंदू समजाच्यावतीने मैंदर्गीतील श्री शिवचलेश्वर मैदानावर ही सभा होणार आहे. रात्री ८ वाजता मोटारीने ते पुण्याकडे रवाना होणार आहेत.