शिक्रापुरः शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय गिलबिले यांची निघृण हत्या
शिक्रापुर (ता. शिरूर) येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार आणि माजी उपसरपंच दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दि. १ रोजी दुपारी १२:१५ वाजता घडली.
हल्ल्याचा प्रकारः
दत्तात्रय गिलबिले हे आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसलेले असताना एका अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर गंभीर वार केले. जखमी अवस्थेत त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
हत्या का घडली?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार,
मालमत्तेचा वाद किंवा अनैतिक संबंध हत्येमागील कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हल्लेखोरांची नावे व संख्या अद्याप निष्पन्न झालेली नाही. पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक हल्लेखोरांच्या शोधात आहे.
परिसरात तणावः
या घटनेमुळे शिक्रापुर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात केला असून पुढील तपास सुरू आहे.
शोककळाः
दत्तात्रय गिलबिले यांच्या मृत्यूमुळे शिक्रापुर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या घटनेचा निषेध केला आहे.
Karma pays