Sassoon Hospital : बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडल्याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांची नोंदणी रद्द

पुणे – ससून रुग्णालयातील बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडल्याप्रकरणी दोन निवासी डॉक्टरांची राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेमधील (एनएमए) नोंदणी सहा महिन्यांसाठी रद्द करावी तसेच एक शैक्षणिक सत्रही रद्द करावे, अशा शिफारशी चौकशी समितीने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे केल्या.
हे धक्कादायक प्रकरण ‘सकाळ’ने २१ जुलै रोजी उघडकीस आणले होते. यासाठी वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर समितीने अहवाल सादर केला.
दोन्ही डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी वसतिगृहातून काढून टाकण्यात यावे, अशीही शिफारस समितीने केली.
बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडल्याप्रकरणी चौकशी समितीने अहवाल सादर आहे. समितीने केलेल्या शिफारशींवर लवकरच निर्णय होईल.
– डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय