गुन्हेगारांचा वर्दीतील चेहरा उघड! पोलिसांच्या प्रतिमेला धक्का; तिनविरा परिसरातील दरोड्यात पोलिसांचा सहभाग; ७ किलो सोने लुटले

n6513979691739257210338c82d74b477801a5c82c4cd22968ba9dd5ffbac17f190a627ec944abd656c7ec0.jpg

अलिबाग – अलिबाग-पेण मार्गावर तिनविरा परिसरात दरोडेखोरांनी ७ किलो सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात रायगड पोलीस दलातील तिघा कर्मचाऱ्यांचा सहभाग उघडकीस आला असून, पोलिसांनी आतापर्यंत १ कोटी ५० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

पोलिसांनीच लुटले सोने!

ही घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, यामध्ये रायगड पोलीस दलातील तीन पोलीस हवालदारांचा समावेश आहे. उर्वरित दोन आरोपी अलिबाग येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

दरोडेखोरांनी लुटलेले सात किलो सोने नागपूरच्या एका व्यापाऱ्याला अवघ्या दीड कोटींना विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही माहिती मिळवत तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली. यापैकी चार आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, एक आरोपी फरार आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी:

1. पोलीस हवालदार समीर म्हात्रे (मुरूड पो. ठाणे)


2. पोलीस हवालदार विकी साबळे (अलिबाग)


3. पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी (फरार)


4. समाधान पिंजारी (मुख्य आरोपी)


5. दीप गायकवाड (आरोपी)

या प्रकरणात पोलिसांचा सहभाग उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ‘कुंपणानेच शेत खाल्ले’ या म्हणीची प्रचिती या घटनेतून आली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Spread the love