राजाभाऊ सरवदे यांना महायुतीच्या कोट्यातून मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्षपदी निवड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे अक्कलकोट रिपाइंचे मागणी
अक्कलकोट(तालुका प्रतिनीधी – महेदिमिया मदार जिडगे) दि.११ राज्यात नव्याने स्थापन करण्यात येणार्या सरकार मध्ये महायुतीच्या कोट्यातून रिपाइं(आठवले)चे प्रदेश अध्यक्ष मा.राजाभाऊ सरवदे यांना मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष करण्यात यावे अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.डॉ.रामदासजी आठवले यांच्या कडे अक्कलकोट ता अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी(बु)गावचे सामाजिक कार्यकर्ते आयु.बाबू अर्जून कांबळे यांच्या नवी मुंबई येथील दिघाव्यांने बांधलेल्या हॉटेल सक्सेस Executive. या नव्या शाखेचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या औचित्य साधून चर्चेत बोलत असतांना हि मागणी अविनाश मडिखांबे व सैदप्पा झळकी यांनी केली आहे.यावेळी रिपाइं आठवले अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,दुधनी मुस्लिम आघाडी शहर अध्यक्ष महेदिमिंया जिडगे,आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी आदी सह मुंबई येथील सिद्राम ओव्हाळ,हवेली ता अध्यक्ष सिध्दुभाऊ कांबळे,राजु कांबळे, निंगप्पा गायकवाड सह ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.