पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा – व्हिडिओ व्हायरल
पुणे: आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार आणि अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. तब्बल दोन तास हा तणावपूर्ण गदारोळ सुरू होता.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला राजकीय रंग लागल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव दिसून आला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली.
पहा व्हिडिओ
दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटाचे देवदत्त निकम निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळे या तणावाला सुरुवात झाली. निकम यांनी वळसे पाटलांवर सभा अपशयास नेण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. दुसरीकडे, अजित पवार गटाने हे आरोप फेटाळले आणि निकम यांच्यावर राजकीय स्वार्थासाठी गोंधळ घालण्याचा पलटवार केला. शेवटी, पोलिसांनी हस्तक्षेप करून देवदत्त निकम यांना सभेतून बाहेर जाण्याची विनंती केली.
दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटाचे देवदत्त निकम निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळे या तणावाला सुरुवात झाली. निकम यांनी वळसे पाटलांवर सभा अपशयास नेण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. दुसरीकडे, अजित पवार गटाने हे आरोप फेटाळले आणि निकम यांच्यावर राजकीय स्वार्थासाठी गोंधळ घालण्याचा पलटवार केला.
शेवटी, पोलिसांनी हस्तक्षेप करून देवदत्त निकम यांना सभेतून बाहेर जाण्याची विनंती केली.