पुणे: वाहतूक पोलीस कारवाईत बदल होणार? नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह!

0
07d30ea1-7dd7-4a2e-a553-dab7f81353eb.jpg

पुणे – पोलीस आयुक्तांकडून नुकतेच वाहतूक पोलिसांसाठी काही महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांनुसार, चौकाचौकांत छुप्या पद्धतीने करण्यात येणारी दंडात्मक कारवाई थांबवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी खरोखरच होणार का? असा प्रश्न आता पुणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई गरजेची असली, तरी काही वेळा नागरिकांना कारण नसताना अडवले जात असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी दिलेले निर्देश म्हणजे जनतेला दिलासा देणारा निर्णय ठरू शकतो, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

दंडाऐवजी वाहतूक नियंत्रणावर अधिक भर देण्याची गरज वारंवार व्यक्त होत आहे. पोलीस फक्त आर्थिक दंडाच्या मागे न लागता, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, शहरातील अवजड बांधकाम वाहने, नियम मोडणाऱ्या खासगी प्रवासी बसेस यांच्यावर कारवाई होणार का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा हे वाहनचालक वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसतात. तरीही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

तसेच, वर्षानुवर्षे सुरु असलेली “कलेक्टर”च्या नावाखाली होणारी कथित वसुली कधी थांबणार? हा प्रश्नही या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आला आहे.

पोलीस आयुक्तांचे आदेश किती प्रभावी ठरतात आणि त्यांची अंमलबजावणी कशी होते, यावर पुण्यातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी पुढील दिशा ठरणार आहे. नागरिक मात्र आशेने या बदलांकडे पाहत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed