Pune water supply : पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद, तुमचा परिसर देखील यादीत आहे का? वाचा…

0

पुणे: पर्वती जलकेंद्रातील ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत गळती थांबवण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.२५) शहराच्या पूर्व भागातील काही पेठांमध्ये आणि लगतच्या परिसरात पाणीपुरवठा थांबविला जाईल.

या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागांना शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी मिळेल.

पर्वती जलकेंद्रातील टाकीवरून भवानी पेठेकडे जाणाऱ्या ६०० मिमी व्यासाच्या वाहिनीत स्वारगेट मेट्रो स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. ही गळती थांबवण्यासाठी गुरुवारी काम केले जाणार आहे. त्यामुळे शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीज मागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी या भागांचा पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed