पुणे: रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी वसिम शेख यांची निवड

IMG_20241023_135844.jpg

पुणे, २३ ऑक्टोबर २०२४: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर अल्पसंख्यांक आघाडीच्या शहराध्यक्ष पदावर वसिम शेख (पैलवान) यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. वसिम शेख यांना अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अयुब शेख आणि खाजाभाई शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

वसिम शेख हे गेल्या १५ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय असून, पुणे शहरातील मुस्लिम समाजाला पक्षामध्ये सामील करून घेण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहणार आहेत. हे त्यांचे शहराध्यक्ष पदावर दुसरे कार्यकाल आहे, ज्यामुळे अल्पसंख्यांक समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नियुक्तीबद्दल बोलताना वसिम शेख यांनी, “माझ्यावर ठेवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल,” असा आत्मविश्वास व्यक्त केला.

Spread the love

You may have missed