पुणे: राजीव गांधी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी अनधिकृत दर आकारणी; समाजसेवक डॅनियल लांडगे यांनी दिले सोनोग्राफी सेंटरला समज – व्हिडिओ

पुणे (प्रतिनिधी) – येरवडा प्रभाग क्रमांक सहा येथील राजीव गांधी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी CGHS दरांपेक्षा जास्त रक्कम आकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारावर समाजसेवक मा. श्री. डॅनियल लांडगे यांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित सेंटरवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
आज, दिनांक २९ जुलै रोजी, समाजसेवक लांडगे हे रुग्णालयाच्या नियमित भेटीवर असताना, एका नागरिकाने तक्रार केली की गेल्या महिन्यापासून उपचार सुरू असून आज सोनोग्राफीसाठी १८०० रुपये आकारण्यात आले. मात्र, CGHS प्रमाणे त्याचे दर फक्त ७०० रुपये आहेत, अशी माहिती रुग्णाने दिली.
पहा व्हिडिओ
या तक्रारीची गंभीर दखल घेत लांडगे यांनी त्वरित रुग्णालयाचे इन्चार्ज डॉ. बागडे यांना सोबत घेऊन सोनोग्राफी सेंटरची पाहणी केली आणि थेट जाब विचारला. रुग्णालय प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या की, पुढील काळात कोणत्याही रुग्णाकडून CGHS दरापेक्षा अधिक शुल्क घेण्यात येऊ नये.
यावेळी, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री. वावरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. संबंधित रुग्णाने लेखी स्वरूपात तक्रार सादर केल्यानंतर, वावरे सरांनी त्वरित तपासणी करून कारवाईचे आश्वासन दिले. तसेच, पुढील वेळेस असे प्रकार घडल्यास संबंधित सोनोग्राफी सेंटरवर ‘टाळा’ ठोकण्यात येईल, असा इशाराही दिला.
या प्रकारामुळे रुग्णालयातील सेवा व शुल्क व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून भविष्यातील चूक टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.