पुणे: “पोर्शेच्या वळणावर टिंगरे गडगडले; पठारे झाले विजयी!”

n6405027391732419885398e2f9ea4b36c61bb96685dcc70e0791c47aad979ce499e766706d3fc0da40ccae.jpg

पुणे: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल यंदाही चर्चेत राहिले. या मतदारसंघात बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – शरद पवार गट) आणि सुनील टिंगरे (राष्ट्रवादी – अजित पवार गट) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.

निवडणुकीच्या अंतिम निकालानुसार, बापूसाहेब पठारे यांनी 4,710 मतांच्या आघाडीने विजय मिळवत विरोधकांना नमवले.

2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना 4,956 मतांनी पराभूत केले होते. मात्र, 2014 मध्ये या मतदारसंघात भाजपचे जगदीश मुळीक यांनी 66,908 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

2019 मध्ये भाजपकडून मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रवादीने सुनील टिंगरे यांना संधी दिली आणि त्यांनी 97,700 मते मिळवत निसटता विजय मिळवला. त्यांच्या तुलनेत भाजपचे जगदीश मुळीक यांना 92,727 मते मिळाली होती.

या निवडणुकीआधी, महाविकास आघाडीतील उमेदवारीच्या समीकरणांमुळे माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली, ज्यामुळे त्यांची टक्कर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत झाली.

यादरम्यान, आमदार सुनील टिंगरे यांचे नाव कल्याणीनगर अपघात प्रकरणात आल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विरोधकांनी या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली असली तरी अजित पवार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा उमेदवारी दिली.

अखेर, बापूसाहेब पठारे यांच्या विजयाने वडगाव शेरी मतदारसंघात एक नवी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत.

Spread the love

You may have missed