पुणे: यंदा मिठाईतील भेसळ तपासणीला अडथळा, अधिकारीच नाहीत!

saamtv_2023-09_de3de8e2-010c-45b4-b689-4b86edb4b91f_Pune_NEws__18_.jpg

पुणे – दिवाळीच्या कालावधीत मिठाई, खवा, पनीर, तूप आणि खाद्यतेल यांच्यासह इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्रतिवर्षी अन्न आणि औषध प्रशासन (एफ्.डी.ए.) विभागाकडून दिवाळीच्या कालावधीत खाद्यपदार्थांची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते; मात्र यंदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने, तसेच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही मोहीम थंडावली आहे.

नागरिकांना सकस, भेसळमुक्त आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याचे दायित्व अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवडणुकीच्या कामाचे दायित्व सांभाळून भेसळ रोखण्यासाठी भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले असल्याची माहिती अन्न अन् औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी दिली. (असे निर्देश का द्यावे लागतात ? अधिकारी-कर्मचारी स्वत:हून काम का करत नाहीत ? – संपादक)

Spread the love

You may have missed