पुणे: केअर टेकरच निघाला चोर! माजी लष्करी अधिकाऱ्याची १.११ कोटींची फसवणूक दोन आरोपी अटकेत

0
esakal_2021-08_d1ff6cb3-e11c-4bc0-a81e-80e587ab37e9_crime_3.jpg

पुणे, प्रतिनिधी :
कॅम्प येथील बँक ऑफ इंडिया शाखेत ज्येष्ठ नागरिक असलेल्या माजी लष्करी अधिकाऱ्याच्या खात्यातून तब्बल १ कोटी ११ लाख ९३ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. केअर टेकरनेच संगनमताने बनावट सही करून ही रक्कम काढल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी मेजर बोमन इरुशॉ अमारिया (वय ८७, सध्या रा. पुण्यधाम वृद्धाश्रम, कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केअर टेकर राज शहा आणि सुप्रितसिंग भुपेंद्र कंडारीया (वय ३९, रा. माधव सोसायटी, कोथरुड) यांच्यासह इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ पासून आतापर्यंत आरोपींनी फिर्यादी यांच्या खात्यातील चेक चोरले. त्या चेकवर फिर्यादींची बनावट सही करून संगनमताने मोठ्या प्रमाणावर रक्कम काढण्यात आली. या गैरव्यवहारातून एकूण १.११ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, या फसवणुकीत सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आर्थिक व्यवहार, बँक कागदपत्रे आणि खात्यांतील हालचालींचा सखोल तपास करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच वपोनि खेतमाळस यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पटेल करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

You may have missed