पुणे: सुनिल मुंडेचा जुगार क्लब उघड; अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई; महिला सहित ३२ अटकेत; लाखोंचा माल हस्त

gambling-raid.jpg

पुणे : शहरातील शुक्रवार पेठेतील अंग्रेवाडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकत ३२ जणांना अटक केली. या कारवाईत १ लाख ४६ हजार ४२० रुपये रोख रक्कम आणि जुगाराची साधने जप्त करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेसह अनेक भागांतील रहिवासी आहेत.

सुनिल भाऊ मुंडे हा या जुगार क्लबचा मालक असल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शुक्रवार पेठेसारख्या मध्यवस्तीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगार खेळणाऱ्या व्यक्ती आढळून आल्या.

पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या आदेशानुसार खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक अंग्रेवाडा येथे गेले. त्यांनी चार गोलाकार टेबलांवर तीन पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे पाहून सर्वांना जागेवरच अडवले. जुगार अड्ड्याचा मॅनेजर भास्कर पंडित याने अड्डा सुनिल भाऊ मुंडे चालवत असल्याचे सांगितले.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांसह २० हून अधिक पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या रक्कमेचा तपास सुरू असून सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Spread the love

You may have missed