पुणे: येरवडा प्रभागातील वाहतूक समस्येवर उपाययोजना – नगरसेविका अश्विनी लांडगे यांचे प्रयत्न

0

पुणे: येरवडा प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेविका सौ. अश्विनी डॅनियल लांडगे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पत्रव्यवहार आणि चर्चा करून अखेर आज सकाळी १० वाजता वाहतूक उपाययोजनांसाठी महत्त्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीत ट्रॅफिक डीसीपी झेंडे साहेब, ट्रॅफिक पोलीस निरीक्षक आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रभागातील वाहतुकीशी संबंधित समस्या मांडल्या आणि लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाले.

मुख्य समस्या: नव्याने बांधलेल्या येरवडा मेट्रो स्टेशनमुळे पादचाऱ्यांसाठी मुख्य रस्ता ओलांडण्याची सोय उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी गुंजन चौक किंवा पर्णकुटी चौकापर्यंत जावे लागते. येरवडा क्षेत्रीय कार्यालय, रेशनिंग ऑफिस, पुणे पोलीस उपआयुक्त कार्यालय आणि पीएमपीएल बसस्टॉप या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सुधारणेसाठी उपाय: नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी ट्रॅफिक विभागासमोर पादचाऱ्यांसाठी Raised Pedestrian Crossing उभारण्याची मागणी केली आहे. तसेच गर्दीच्या वेळी वाहतूक वॉर्डन किंवा वाहतूक पोलीसांची नेमणूक करून वाहतूक नियंत्रित करण्याची सूचना दिली आहे.

जीवितधोका आणि सुरक्षितता: या मार्गावर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रस्ता ओलांडताना संभाव्य जीवितधोक्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे लांडगे यांनी अधोरेखित केले.

या पाहणी दरम्यान मा. डॅनियल लांडगे, मोहम्मद शेख अकबर खान, आकाश घुमे, आकाश चव्हाण, अमन अभंगे, करण बाटुंगे हे देखील उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed