पुणे: येरवडा-लक्ष्मीनगरमध्ये ‘सिंघम’ची धडक; गुन्हेगारांना थेट इशारा, नागरिकांत विश्वास – व्हिडिओ
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील येरवडा व लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आपल्या निर्भीड, कर्तव्यदक्ष आणि कठोर कारवाईमुळे ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गुन्हेगारांवर धडाकेबाज मोहीम राबवली असून, त्यामुळे परिसरात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहा व्हिडिओ
गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींनी तात्काळ गैरकृत्य थांबवावे, अन्यथा कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठाम संदेश पोलिस यंत्रणेमार्फत देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम हे सातत्याने गस्त, तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाया करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा आणि पोलिसांवरील विश्वासाचा भाव बळावला असून, गुन्हेगारीला थारा न देण्याचा निर्धार पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.