पुणे: मोकाट जनावरांमुळे अपघातांचा धोका; सामाजिक कार्यकर्त्यांकडून PMC व पोलिसांना कारवाईची मागणी
पुणे – शहरातील विविध भागांमध्ये, विशेषतः मार्केट यार्ड परिसरात मोकाट जनावरे आणि गाई-म्हशींचा वाढता त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो असून, अनेकदा अपघातांचीही शक्यता निर्माण होते.


सामाजिक कार्यकर्ते इस्माईल शेख यांनी याबाबत पुणे महानगरपालिका, वाहतूक विभाग, मार्केट यार्ड पोलीस स्टेशन तसेच महापालिकेच्या कोंढवाड आरोग्य प्रमुख (पशुविभाग) यांना कारवाईसाठी लेखी निवेदन दिले आहे.
शेख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “मोकाट गुरांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संबंधित जनावरांचे मालक तसेच पुणे महानगरपालिका यांनी जबाबदारी स्वीकारून नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा निष्काळजीपणाबद्दल कायदेशीर नोटीस देऊन योग्य नियंत्रण व अंमलबजावणी करावी.”
शहरातील काही मुख्य रस्ते, मार्केट यार्ड व कोंढवाड परिसरात गुरे रस्त्यावर आढळतात. त्यामुळे नागरिक, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना अपघातांचा धोका वाढला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला यापुढील अपघात टाळण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.