Ganpati Visarjan 2024 : पुणेकरांनो…गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त ‘हे’ प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस राहणार बंद

0

पुणे: गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी 2024 मध्ये पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. शहरातील मध्य भागातील १७ प्रमुख रस्ते मिरवणुकीसाठी वाहतुकीस बंद राहणार असल्याचे वाहतूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणूक मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरू होणार आहे.

वाहतूक बंद रस्त्यांची यादी: लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता आणि गुरू नानक रस्ते मिरवणुकीच्या समाप्तीपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

वाहनचालकांसाठी मार्गदर्शक सूचना: मिरवणुकीदरम्यान या रस्त्यांवर वाहनांची पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. खंडुजीबाबा चौक ते वैशाली हॉटेल चौक दरम्यानच्या उपरस्त्यांवरही वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद असेल. विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

वर्तुळाकार मार्ग: वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी यंदाही वाहनचालकांसाठी वर्तुळाकार मार्ग ठरविण्यात आला आहे. यात कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, संचेती रुग्णालय, मंगळवार पेठ, सातारा रस्ता आणि सिंहगड रस्त्यासह विविध प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.

वाहनचालकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाचे पालन करावे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed