पुणे – अमित शहांच्या निषेधार्थ दांडेकर पुलावर आंदोलन

पुणे, 23 डिसेंबर।भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेपहार्य विधान केले आहे.त्या विरोधात समस्त आंबेडकर अनुयायांनी दांडेकर पूल येथे आंदोलन केले.
या मध्येदांडेकर पूल परिसरातील सर्व धार्मिय नागरिक,महिलांचा तसेच तृतीय पंथीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झाले.आंदोलनामध्ये अमित शहा ची अंत्ययात्रा काढून तिचे चौकामध्ये दहनकरण्यात आले.
यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी मुंडन करून बोंबा मारून निषेध केला. तसेच त्यांच्या फोटोला महिलांनी चपलांचा मारा केला सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये अनिल मास्तर गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, सुरेखा ताई गायकवाड,, मच्छिन्द्र मामा गायकवाड हनुमंत फडके मामा भोसले, मधुकर काशीद दत्ता सुरते, ऍड किरण कदम किरण गायकवाड, मुकुंद गायकवाड, धुरंधर भालशंकर, मीनाक्षी बनसोडे, सोनिया ओव्हाळ, मीनाक्षी माने, सुवर्णा शिंदे, रजनी लांडगे, यशवंत भोसले, हृषी वाघमारे,राम कदम, दादा पायगुडे, मिलिंद बनसोडे, वसंत कांबळे नागेश भोसले तसेच राहुल अनिल गायकवाड आदी असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
—————