Pune news : IAS Pooja Khedkar : खोट्या ‘अपंगत्व’ प्रमाणपत्राच्या जोरावर, पूजा खेडकर झाल्या कलेक्टर ?

0

पुणे : केंद्रीय लोकसेवा अायोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतून २०२३ मध्ये अायएएसपदी नियुक्ती झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भालग (ता. पाथर्डी) गावच्या पूजा दिलीप खेडकर या नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यापासून त्यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत. खासगी अॉडी कारवर विनापरवाना लाल दिवा लावून मिरवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावण्याच्या त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांच्या बदलीसाठी राज्याचे मुख्य अपर सचिवांकडे पत्र पाठवले होते. त्यानुसार पूजा खेडकर यांची तातडीने वाशिमला उचलबांगडी करण्यात आली.

हायफाय लाईफ स्टाईल असलेल्या पूजा यांची नियुक्तीही वादात अडकली आहे. यूपीएससीत त्यांना ८२१ ऑल इंडिया रँक होता. या रँकमध्ये आयएएस बनणे अशक्य असते, पण व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टिदोष प्रमाणपत्रे सादर करत त्यांनी दिव्यांगांच्या सवलतीतून आयएएस पद मिळवले. नियुक्तीनंतर यूपीएससीने त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी सहा वेळा पाचारण केले. पण २२ एप्रिल २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२ या काळात त्यांनी वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ केली. नंतर एका एमआरआर सेंटरमधून वैद्यकीय प्रमाणपत्र आणून त्यांनी यूपीएससीला सादर केले. यूपीएससीने त्यावर आक्षेप घेतला व पूजा यांच्या नियुक्तीला सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये (कॅट) आव्हान दिले. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी कॅटने पूजा यांच्या नियुक्तीविरोधात निकाल दिला. तरीही त्यांना

नियुक्तीविरोधात निकाल दिला. तरीही त्यांना प्रोबेशनरी अधिकारीपदाची ऑर्डर कशी काय देण्यात आली? याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.”

स्वतंत्र गाडी, शिपायासाठी हट्ट; जिल्हाधिकाऱ्यांवरही आरोप
पूजा यांना जूनमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या. सुरुवातीपासूनच स्वतंत्र गाडी, शिपाई व बंगला व कार्यालयासाठी हट्ट धरला. स्वतःच्या ऑडी कारवर विनापरवानगी लाल दिवा लावून व महाराष्ट्र शासन असे लिहून त्या फिरत होत्या. एक वरिष्ठ अधिकारी कामाच्या निमित्ताने मुंबईला गेले असताना, त्यांच्या अँटी चेंबरमधील सामान बाहेर काढून त्याजागी स्वतःचे कार्यालय थाटले. या विषयी तक्रारी आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी खेडकरांना ते केबिन सोडण्यास सांगितले. त्यावर त्यांनी उलट जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज करुन हा माझा अपमान असल्याचे सांगत वेगवेगळे अारोप केले होते.

वडील निवृत्त सनदी अधिकारी, लोकसभा निवडणूकही लढले
पूजाचे वडील दिलीप खेडकर माजी सनदी अधिकारी असून ते प्रदूषण विभागाचे अायुक्त होते तर अाईचे वडील जगन्नाथराव बुधवंत अायएएस अधिकारी होते. तिच्या वडिलांनी अहमदनगर दक्षिणमधून नुकतीच वंचित पक्षाच्या पाठिंब्याने लोकसभा लढली होती. दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना ‘माझ्या मुलीला त्रास दिला तर तुमची काही खैर नाही’ अशी धमकीही दिली होती.

वर्षभरापूर्वी आपणच दिलेल्या नियुक्तीला यूपीएससीकडून आव्हान पूजा खेडकर यांची लाइफस्टाइल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचे फोटोसेशन व लालदिवा लावलेल्या गाडीचा फोटो व्हायरल होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed