पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी निखिल गायकवाड

0
IMG-20260102-WA0028.jpg

पुणे, प्रतिनिधी —
पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व निखिल गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते त्यांना पुणे शहर सामाजिक न्याय विभागाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार व पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, मुस्लिम बँकेचे उपाध्यक्ष ॲड. आयुब शेख, अजय सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निखिल गायकवाड हे गेल्या वीस वर्षांपासून पुणे शहरातील विविध लोकप्रिय दैनिकांमधून पत्रकार म्हणून कार्यरत असून सामाजिक प्रश्नांवर त्यांची ठाम व अभ्यासपूर्ण भूमिका ओळखली जाते. फुले–शाहू–आंबेडकरी विचारधारेतून कार्य करत त्यांनी ‘निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट’च्या माध्यमातून अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबवले आहेत.

त्यांना सामाजिक व राजकीय वारशाचाही लाभ लाभलेला आहे. पुणे महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, शांतीनगर येथून सलग तीन वेळा (१९७४ ते १९८५) विनाप्रचार निवडून आलेले रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक दिवंगत विजयराव गायकवाड (काका) यांच्या कार्याचा वारसा निखिल गायकवाड यांना मिळाला आहे.

यापूर्वी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठीही सक्रियपणे काम केले आहे. समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक व अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्या निवडीकडे पाहिले जात असून, या नियुक्तीमुळे पुणे शहरातील सामाजिक न्याय विभाग अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

निखिल गायकवाड यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Spread the love

Leave a Reply