पुणे: मोक्का आरोपी गायकवाडचा धानोरीत दहशत; हॉटेल तोडफोड, खंडणीसाठी धमकी; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

IMG_20250120_112241.jpg

पुणे : मोक्काच्या कारवाईनंतर जामिनावर सुटलेल्या सराईत गुंड रोहन गायकवाड याने आपल्या साथीदारांसह धानोरी जकात नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये तोडफोड करत हॉटेल चालक व व्यवस्थापकाला मारहाण केली. तसेच, हॉटेल चालवायचे असल्यास दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी करत धमकी दिली. याप्रकरणी गायकवाडसह आठ जणांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंड रोहन गायकवाड आणि गणेश राठोड यांच्यासह आठ जणांवर हॉटेल चालक अन्सार गफूर शेख (वय ३२, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गायकवाड हा मोक्काच्या कारवाईमुळे येरवडा कारागृहात होता. मात्र, न्यायालयाकडून जामीन मिळवून तो सुटला आणि पुन्हा धानोरी परिसरात दहशत माजवू लागला.

हॉटेलमध्ये तोडफोड आणि मारहाण
शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गायकवाड आणि त्याचे साथीदार धानोरी जकात नाका परिसरातील हॉटेल अमिरमध्ये आले. जेवणादरम्यान त्यांनी हॉटेलमधील ग्राहकांना शिवीगाळ करत भांडणे सुरू केली. हॉटेल मालक अन्सार शेख यांनी हे भांडण थांबवून गायकवाड आणि त्याच्या साथीदारांना हॉटेल सोडण्यास सांगितले. काही वेळानंतर गायकवाड पुन्हा हॉटेलमध्ये परतला आणि हॉटेल व्यवस्थापक शरीफ शेख यांच्यावर कठीण वस्तूने हल्ला केला. त्यात शरीफ शेख गंभीर जखमी झाले.

हप्त्यासाठी धमकी
गायकवाडने हॉटेल मालक अन्सार शेख यांना धमकावत, हॉटेल चालवायचे असल्यास दरमहा १५ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. शिवाय हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करत असून गायकवाड व त्याचे साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Spread the love

You may have missed