पुणे: मनसेच्या राड्याचा सुरक्षारक्षकांना फटका; पाच जणांची बदली

0
500px-Pune_Municipal_Corporation_building_in_October_2023.jpg

पुणे – महापालिका आयुक्तांच्या बैठकीदरम्यान मनसे पदाधिकार्‍यांनी घातलेल्या गोंधळाचा थेट फटका सुरक्षारक्षकांना बसला असून दोन कायमस्वरूपी व तीन कंत्राटी सुरक्षारक्षकांची बदली करण्यात आली आहे. आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत त्रुटी झाल्याचा ठपका ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. स्वच्छतेच्या विषयावर आयुक्त नवल किशोर राम अधिकारी वर्गासोबत बैठक घेत असताना माजी नगरसेवक अ‍ॅड. किशोर शिंदे, संजय भोसले, तांबोळी यांच्यासह आणखी एक मनसे कार्यकर्ता थेट मीटिंग रूममध्ये घुसला. या वेळी आयुक्त आणि मनसे पदाधिकार्‍यांमध्ये तीव्र वाद झाले.

यानंतर आयुक्त कार्यालयाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन केले, तर मनसे व महाविकास आघाडीने देखील निषेध आंदोलन केले.

घटनेनंतर सुरक्षेतील झालेल्या कसूर मानून दोन कायमस्वरूपी व ‘ईगल सिक्युरिटी अँड पर्सोनल सर्व्हिसेस’ या कंत्राटी कंपनीचे तीन रक्षक यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply