पुणे: मनसेचा पाठपुरावा यशस्वी, खान वस्ती परिसरात पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी मोठे पाऊल – व्हिडिओ
वारजे रामनगर येथे मुख्य मल्लनिस्सारन वाहिनीच्या कामाला सुरुवात
पुणे: वारजे, रामनगर, खान वस्ती परिसरातील कॅनॉल रोड मुख्य रस्त्यावर महत्त्वाच्या मल्लनिस्सारण वाहिनीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. या विकासकामासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पहा व्हिडिओ
या कामामुळे काही दिवसांसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
या प्रकल्पासाठी मनसेच्या स्थानिक शाखेने सातत्याने पाठपुरावा केला होता. मनसे शाखा अध्यक्षा रिया शेख यांनी या कामाच्या सुरुवातीबद्दल समाधान व्यक्त केले असून, नागरिकांच्या कररूपी निधीतून ही सुविधा साकारत असल्याने प्रशासनाचे आभार मानले आहेत.