पुणे: मसाज की काहीतरी ‘मॅनेज’? खराडीतील स्पामध्ये उघडकीस आली ‘बंद दारांमागची’ काळीकुट्ट हकीगत!
पुणे: पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली नेमकं चालतं तरी काय—हा प्रश्न नागरिकांमध्ये वारंवार उपस्थित होतो. पण खराडीतील ‘व्हाईट लोटस स्पा’वर पडलेल्या पोलिसांच्या छाप्याने या प्रश्नाचं उत्तर थेट डोळ्यासमोर आणून ठेवले आहे. मसाज रूमच्या बोर्डाखाली जे काही सुरु होतं, ते व्यावसायिक मसाजपेक्षा फारच वेगळं आणि कायद्याच्या चौकटीबाहेरचं होतं.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांनी त्यांच्या विशेष पथकासह गैरकृत्याची खबर मिळाल्यावर अचानक धाड टाकली. आणि मग समोर आलं धक्कादायक वास्तव—मसाज सेंटर नाही, तर महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्याचं केंद्र! ‘व्हाईट लोटस’ नावाने पांढरेपणा दाखवण्याचा प्रयत्न, पण आतमध्ये मात्र काळोखी धंद्याची गुन्हेगारी रचना.
आरोपी स्पा मालक तरुन्नम मनसुर खान (वय 33) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खान महिलांना मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होता, तसेच भाग पाडत होता. म्हणजे बाहेरच्या बोर्डावर ‘Relax, Refresh, Rejuvenate’ आणि आतमध्ये ‘Exploit, Abuse, Profit’?—पुणेकरांनी विचारावंच!
या छाप्यात तीन महिलांची सुटका करण्यात आली. आणि नेहमीप्रमाणे पुढील तपासाची सूत्रं आशालता खापरे यांच्या हातात देण्यात आली आहेत. पण प्रश्न असा की— शहरात अशा मसाजच्या पाट्या लावून किती जण कायद्याला चकवा देत बसलेत? पोलिस छापा टाकतात तेव्हा सगळं समोर येतं, पण उरलेले ३६४ दिवस हे सेंटर कसं मोकळेपणाने चालतं?
खराडी, वाकड, बाणेर, औंध— कोणत्या भागात अशी ‘स्पा-फॅक्टरी’ उभी आहे, हे सामान्य नागरिकांना सांगायला कुणी तयार नाही. पण सोशल मीडियावर चमकणाऱ्या ‘Luxury Spa’ जाहिरातींच्या मागे कोणता धंदा चालतो, हे आता पुणेकरांना समजायला सुरुवात झाली आहे.
मसाज रूममध्ये खरंच काय चालतं?
पोलिसांनी दाखवलेलं सत्य सांगतं— पुण्यातील काही स्पा म्हणजे आरोग्य केंद्र नव्हे, तर अनैतिक धंद्याची नवीन शाखा!