पुणे गारठले! मोसमातील सर्वांत थंड सकाळ; गुलाबी थंडीत पुणे थरारले! तापमानात मोठी घसरण
पुणे : सध्या पुणेकर थंडीने कुडकुडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रचंड गारवा जाणवत आहे. दिवस मावळल्यानंतरच नाही तर चक्क दिवसादेखील पुण्यात खूप थंडी जाणवत आहे. त्यातच आता गेल्या सहा वर्षातील सर्वात निश्चित तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे.
पुण्याच्या काही भागात 6.1 तापमानाची नोंद झाली आहे.
शनिवारनंतर पुणे शहरात थंडी जास्त वाढली आहे. रविवारी आणि सोमवारी तापमानाचा पारा जास्त घसरल्याचं दिसून आलं. त्यामुळेच सोमवारी 2018 नंतर आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान नोंद केलं गेलं. 2018 मध्ये 5.9° सेल्सियस तापमान नोंद करण्यात आलं होतं. त्यानंतरचं नीचांकी तापमान यंदाचे मोसमात नोंद करण्यात आलं आहे. गेल्या दहा वर्षातील सर्वात नीचांकी तापमान खालीलप्रमाणे
2013- 6.8
2014- 7.8
2015- 6.6
2016- 8.3
2017- 8.7
2018- 5.9
2019- 13.7
2020- 8.1
2021- 11.2
2022- 8.9
2023- 11.3
2024- 6.1 (17 डिसेंबर पूर्वी शहरातील काही भागात)