पुणे: बेकायदेशीर सेवा आणि अवैध शुल्क – येरवडा, क्षेत्रीय कार्यातील आधार केंद्रात गैरव्यवहाराचा पर्दाफाश! नागरिकांची लूट सुरूच! – व्हिडिओ

IMG_20250207_020023.jpg

पुणे, ७ फेब्रुवारी २०२५ – येरवडा, कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयातील मधील आधार केंद्रात अनधिकृतपणे अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार, आधार कार्डच्या प्रिंटआउटसाठी १०० रुपये घेतले जात आहेत, तर आधार अपडेटव्यतिरिक्त इतर अनेक सेवा बेकायदेशीरपणे पुरवल्या जात आहेत.

अनधिकृत सेवा आणि बेकायदेशीर शुल्क:
आधार केंद्रात अधिकृतरित्या केवळ आधार कार्ड अपडेट करण्यास परवानगी आहे, मात्र येथे पॅन कार्ड, गॅझेट, उत्पन्न दाखले, मोबाईल नंबर लिंकिंग यांसारखी कामेही होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सर्व सेवांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पहा व्हिडिओ


प्रशासनाचा दुर्लक्ष?
या संदर्भात आधार केंद्राचे अधिकारी सुशील खोत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. त्यामुळे या गैरप्रकारांची दखल घेतली जात आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांची मागणी:
या प्रकाराची सखोल चौकशी करून अनधिकृत शुल्क वसूल करणाऱ्या आधार केंद्राविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका व प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या लुटीला आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Spread the love

You may have missed