पुणे: हडपसरमध्ये हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या उमेदवारीसाठी हजारोंचा रॅलीत सहभाग
पुणे: रविवारी (दि. 15): हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या समर्थकांनी रविवारी दुपारी भव्य टु व्हिलर आणि रिक्षा रॅलीचे आयोजन केले. कोंढवा बुद्रुक येथून कॉंग्रेस भवन, पुणे पर्यंत ही रॅली निघाली, ज्यात हजारो कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. हलगी आणि ताशांच्या गजरात परिसराचा माहोल दुमदुमला होता.
हाजी उस्मान शेठ तांबोळी यांचे चिरंजीव अर्शद तांबोळी आणि त्यांचे मित्र परिवार या रॅलीचे नेतृत्व करत होते. हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी गेल्या 50 वर्षांपासून कॉंग्रेस पक्षाशी निष्ठा राखून निस्वार्थ सेवा केली असून, त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून मतदारांनी त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
कॉंग्रेस भवनात आयोजित मुलाखतीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार यशोमती ठाकूर, कॉंग्रेसचे समन्वयक श्री. दरेकर, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी मुलाखतीदरम्यान नमूद केले की, पुण्यात आजपर्यंत अल्पसंख्यांक समाजातील उमेदवाराला उमेदवारी मिळालेली नाही. त्यांनी जात, धर्म न पाहता प्रत्येकाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले आहे, आणि या पार्श्वभूमीवर मतदारांच्या आग्रहास्तव त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी विश्वास व्यक्त केला की, पक्ष त्यांच्या कार्याचा योग्य विचार करून त्यांना उमेदवारीची संधी देईल.