पुणे: रेल्वे पार्सलमधून गुटख्याची तस्करी उघड; पुणे स्थानक परिसरात तिघांना अटक

0
vsrs-news-pune-railway-station-come-before-1-hours-passenger.jpg

पुणे : रस्ते वाहतुकीनंतर आता गुटख्याची तस्करी रेल्वेच्या पार्सल सेवेतूनही केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकासमोरील पार्सल विभागातून गुटखा शहरात वितरणासाठी नेण्याच्या तयारीत असताना अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सापळा रचून तिघांना अटक केली.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल पावणेपाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अटक आरोपींची नावे अशी :

जवाद अफसरखान (४०, रा. कांचन सोसायटी, उंड्री-पिसोळी)

दिलीप मानसिंग मेमाणे (४३, रा. दादा जाधवराव हायस्कूल, जेजुरी)

इरफान मकबुल शेख (४५, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ)


या संदर्भात पोलिस हवालदार मारुती पारधी यांनी तक्रार नोंदवली आहे.

गुटख्याची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीही कारवाया केल्या आहेत. काही ठिकाणी कापडाच्या मालामध्ये लपवून गुटखा नेला जात असल्याचे आढळले होते, तर कधी मोठ्या टेम्पोपासून छोट्या टेम्पोत गुटखा पोहोचवण्याचे टप्पे उघड झाले होते. मात्र, आता रेल्वे पार्सलमधूनच तस्करी होत असल्याचे समोर आल्याने पोलिसांचा चौकशीचा फोकस आणखी वाढला आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा माफियांच्या तस्करीच्या नव्या डावांना मोठा धक्का बसला आहे.

Spread the love

Leave a Reply