पुणे: येरवड्यात रोजगार मेळावा: 123 तरुणांना मिळाली नोकरीची संधी; मनोज शेट्टी सोशल फाउंडेशनचा पुढाकार

पुणे: मनोज शेट्टी सोशल फाउंडेशन आणि लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने येरवड्यात मोठ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 123 तरुण आणि तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.


येरवडा हा पुण्यातील मोठ्या लोकसंख्येचा परिसर असून, येथे सुशिक्षित तरुण-तरुणींना नोकरीच्या संधी मिळाव्यात, त्यांचे कौशल्य प्रस्थापित व्हावे यासाठी अशा मेळाव्यांचे सातत्याने आयोजन केले जाते, असे मनोज शेट्टी सोशल फाउंडेशनच्या श्रद्धा शेट्टी यांनी सांगितले.
फाउंडेशनचे संस्थापक मनोज शेट्टी यांनी या वेळी सांगितले की, “आतापर्यंत १२,५०० हून अधिक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज गिरासे, नौसीन शेख, शबनम शेख, अरुण शेट्टी, विशाल शेलार, मोईन पठाण आणि लाईट हाऊस टीमने मोलाचे योगदान दिले.