पुणे शहरः येरवड्यात क्रिकेट खेळण्याच्या वादातून राडा येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

n60952307817159685369179771badf9697bfd2a543118177a1940040b6cca710e918088807fe3c7fba403c.jpg

पुणे : येरवड्यातील मनोरुग्णालया समोरील मैदानात क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दोन जणांवर धारदार कोयत्याने वार करण्यात आले. तसेच संबधित टोळक्याने महिलांशी अश्लील वर्तन केल्याने सहा जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध विनयभंग, तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हुसेन अस्लम खान, आमीर अस्लम खान, अस्लम हैदर खान, शोएब रशीद कुरेशी, वीरेन वाघेला, स्टीफन जॉन्सन शिरसाठ (सर्व रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ५१ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

पहा व्हिडिओ

येरवड्यातील मनोरुग्णालया समोरील मैदानात आरोपी क्रिकेट खेळत होती. किक्रेट खेळताना आरोपींचा विल्सन मरिअन याच्याशी वाद झाला.

वादातून त्यांनी विल्सननला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तक्रारदार महिला, तिची छोटी बहीण, तसेच हरिश बबन काळे, यशवंत बबन काळे भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी आमीर खान याने घरातून कोयता आणि कुकरी आणली. आरोपींनी हरिश काळे यांना कोयत्याच्या दांड्याने मारहाण केली. यशवंत काळे यांच्या खांद्यावर कोयत्याचा दांडा मारला. आरोपींनी तक्रारदार महिलेच्या लहान बहिणीशी अश्लील कृत्य केले.

त्यावेळी महिलेच्या दोन मुली तेथे आल्या. त्यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारू, अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक तुषार दोडमिसे पुढील तपास करत आहेत.

Spread the love

You may have missed