पुणे शहर: बंडगार्डन परिसरातील नामांकित शाळेत महिलेला त्रास; प्रशासकाविरुद्ध गुन्हा दाखल

n5581741281700503791719d5f77fc14c9f81d1c0bbf18917f2d9e70af580de3394bac1beeb9af87220173b.jpg

पुणे – जे. एन्. पेटिट टेक्निकल हायस्कूल आणि शिक्रापूर येथील शिवतारा पर्यटनस्थळात ५ सप्टेंबर २०२३ ते ९ जुलै २०२४ दरम्यान शाळेतील एका महिलेला अश्लील शेरेबाजी करून, तिला जबरदस्ती मिठी मारत तिच्याकडून शारीरिक संबंधांची मागणी करत विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शाळेचा प्रशासक प्रशांत पुष्टी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी तिचा विनयभंग करत होता आणि याविषयी कुणाला सांगितल्यास तिला नोकरीवरून काढण्याची धमकी देत होता.

अशा नीतीहीन व्यक्तीकडून विद्यार्थ्यांसमोर कोणते आदर्श प्रस्थापित होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Spread the love

You may have missed