पुणे शहर तहसीलदार पद ‘रामभरोसे’: निलंबनाला १२ दिवस… अधिकारी मात्र बेपत्ता!

0
IMG_20251119_165100.jpg

पुणे : शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करून तब्बल १२ दिवस उलटले, पण पुणे शहर तहसील कार्यालयाचा कारभार मात्र अधिकार्‍यांइतकाच गायब!

कोरेगाव पार्क जमीन खरेदी व बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणात येवले यांचे निलंबन झाले, आणि त्यानंतर कार्यालयाचा कारभार अक्षरशः ठप्प झाला आहे.

निलंबनानंतर कार्यभार प्रभारी करमणूक अधिकारी सतीश थेटे यांच्याकडे देण्यात आला… पण थेटे साहेब १२ दिवस एकदाही हजर नाही!

म्हणूनच, ‘नवे खूर्चीवर बसवूया’ म्हणत अस्मिता माने यांची नियुक्ती झाली; मात्र त्या देखील कार्यभार स्वीकारायलाच तयार नाहीत!

म्हणजे तहसीलदार पदाला ना जुना मालक, ना नवा!
आणि तहसील कार्यालय — रामभरोसे!

साहेबच नसल्याने कामे ठप्प… नागरिकांच्या चकरा मात्र वाढल्या!

तहसीलदार नसल्याने

गौण खनिज परवाने

चौकश्या, सुनावण्या

माहिती अधिकार अपीले

ईटीएस मोजणी

विविध कारवाया

ही सर्व महत्त्वाची कामे पेंडिंग आहेत.
नागरिक मात्र “उद्या या” या जुन्या सरकारी मंत्राखाली रोज़च्या चकरा मारत थकलेत.

जिल्हाधिकारी साहेब, लक्ष घालणार की हेही ‘फॉरवर्ड’ करणार?

पुणेकरांचा प्रश्न सरळ आहे —
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याकडे शेवटी लक्ष घालणार का?
की १२ दिवसांचे २२ होणार, आणि तरीही तहसीलदारांची खुर्ची तशीच रिकामीच राहणार?

सरकारचे आदेश वेगानं येतात,
अधिकारी मात्र दिसतच नाहीत…
आणि शहराचा कारभार?
तो तर परमेश्वरावरच!

Spread the love

Leave a Reply

You may have missed